आदमापूर येथे आठ तालुक्यातील पत्रकारासाठी कार्यशाळेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2019

आदमापूर येथे आठ तालुक्यातील पत्रकारासाठी कार्यशाळेचे आयोजन


कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रविवार दि. ३ मार्च 2019 रोजी 10 वाजता 
आदमापूर (ता. भुदरगड) येथे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, भुदरगड, राधानगरी, करवीर, निपाणी अशा आठ तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहीती अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली. 
या कार्यशाळेत प्रा. शिवाजीराव जाधव यांचे "ग्रामिण पत्रकारीता" विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थान कौन्सील मेंबर प्रा. भास्कर चंदनशिवे भुषवणार आहेत.  प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी, कौन्सील मेंबर नंदकुमार कांबळे, कौन्सील मेंबर अतुल मंडपे,कौन्सील मेंबर सुरेश कांबरे, कौन्सील मेंबर डॉ. निवास वरपे, कौन्सील मेंबर डॉ. टी. एस. पाटील, कौन्सील मेंबर दीपक मांगले, कौन्सील मेंबर शशिकांत राज,जिल्हा संघटक प्रा. रविंद्र पाटील, जिल्हा संघटक अवधूत आठवले, जिल्हा उपाथ्यक्ष प्रकाश तिराळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, बेळगांव जिल्हाध्यक्ष विठ्ठल केसरकर आदींची आहे.
कागल तालुका अध्यक्ष महादेव कानकेकर, मुरगूड शहर अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी खतकर, राधानगरी तालुका अध्यक्ष अशोक पाटील,करवीर तालुका अध्यक्ष अमर वरूटे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष रविंद्र हिडदुगी, आजरा तालुका अध्यक्ष बशीर मुल्ला, चंदगड तालुका अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ८ तालुक्यातील सर्व दैनिकांच्या पत्रकारांनी सकाळी १o वाजता आदमापूरमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यशाळेमध्ये सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत चर्चासत्र, 11.30 ते 1 प्रा. शिवाजीरा जाधव यांचे व्याख्यान हॉटेल त्रिवेणी नविन इमारत हॉल या ठिकाणी होणार आहे. सर्व पत्रकारांनी संघाचे ओळखपत्र परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहावे. 

No comments:

Post a Comment