![]() |
किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे रेडेकर फौंडेशनच्या वतीने शिवोत्सवाला प्रारंभ |
चंदगड / प्रतिनिधी
रमेशराव रेडेकर फाऊंडेशन आयोजित शिवचरित्राच्या पारायणाचा शुभारंभ किल्ले पारगड (ता. चंदगड) येथील भगवती मंदिरात करण्यात आला. चार दिवस चालणार्या या पारायण सोहळ्यात लेखक कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखीत शिवचरित्राचे वाचन केले जाणार आहे. या पारायणाचा शुभारंभ रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी प्रथम भागाचे वाचन करुन केले. तत्पुर्वि शिवचरित्राची विधीवत पूजा पारगडावरील भगवती मंदिराचे पुजारी ह.भ.प.जोशी काका यांच्या हस्ते झाली. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य युवराज जाधव, नितीन फाटक,एल.टी.नवलाज,पवन डोंगरे, अरुण पाटील,व शिवभक्त दत्तात्रय डोंगरे, विकास सुतार, अभिजित मांगले,जयसिंग जाधव,विकास पाटील,पारगडावरील शेलारमामा,प्रकाश चिरमुरे, पोलीस पाटील भगवान गडकरी आदी उपस्थित होते. केंचेवाडी येथील ह.भ.प.सुशांत मोरे महाराज आणि सहकारी यांच्या भजन कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता होणार आहे. याचबरोबर बुझवडे येथील दत्ता दळवी आणि सहकारी यांच्या शिवकालीन दांडपट्टा व लाठीकाठी फिरवणे या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होणार आहे. सदर पारायणाचा लाभ शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment