एन. एम. एम. एस परीक्षेत तुडयेच्या श्री रामलिंग हायस्कूलचे अभिनंदनीय सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2019

एन. एम. एम. एस परीक्षेत तुडयेच्या श्री रामलिंग हायस्कूलचे अभिनंदनीय सुयश

प्राची मयेकर,             ऋतुराज वाणी,           विघ्नेश हुलजी
अडकूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे यांच्या वतीने सन २०१८ /१९ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस परीक्षेत श्री रामलिंग हायस्कूल  तुडये  (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यालयाची कु. प्राची पुंडलीक मयेकर, कु. ऋतुराज बळवंत वाणी  आणि कु. विघ्नेश राजाराम हुलजी यांनी घवघवीत  शिष्यवृत्ती मिळवली. त्यांना शासनाच्या वतीने दिली जाणारी दरवर्षी १२००० रुपये प्रमाणे ४ वर्षात प्रत्येकाला ४८००० रूपये इतकी शिष्यवृत्ती  मिळणार आहे. त्यांना  एम. एल. बोकडे,  आर. डी. पाटील,  व्ही. एम. पाचवडेकर व  व्ही .एल. कांबळे यांचे मार्गदर्शन तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, माणगांवचे अध्यक्ष  महादेव  पाटील, सचिव राजेश पाटील, सहसचिव जी. एन. गणाचारी व प्राचार्य आय. के. स्वामी यांचे प्रोत्साहन लाभले.  या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



No comments:

Post a Comment