चंदगड / प्रतिनिधी
पुलवामा येथे दशहतवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्यात 42 भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. या हल्याच्या बाराव्या दिवशी याचे प्रत्युतर म्हणून भारतीय हवाई दलाने आज पहाटे साडेतीन वाजता पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करुन तळ उध्वस्थ केले. ही घटना कळताच चंदगड शहरामध्ये युवकांनी फटाकड्या वाजवून, जिलेबी व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी चंदगड बाजारपेठेतून फेरी काढून भारत माता की जय, गली गली मे शोर है, पाकिस्तान चोर है, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला हा योग्य असून त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. या हल्याला युवकांनी एकत्र येवून पाठींबा दर्शविला आहे. तरुण या घटनेबद्दल एकमेकांना शुभेच्छा देत होते.
काश्मीर येथे पुलवामा येथील झालेल्या दहशतवादी हल्यात आपले भारतीय जवान शहीद झाले होते .याचा बदला भारतीय सेनेने घेत बालकोट येथे बॉम्ब टाकून 250-300 दहशतवादी याचा खात्मा केला .या भारतीय सेनेच्या उत्तम कामगिरीमुळे चंदगड येथे संभाजी चौकामधे शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळून आनंद व्यक्त करण्यात आला. आणी फटाके वाजवत , साखर पेढे वाटप करत शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला
No comments:
Post a Comment