चंदगडच्या तहसिदारपदी विनोद रणावरे रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2019

चंदगडच्या तहसिदारपदी विनोद रणावरे रूजू

   चंदगड येथे नूतन तहसिलदार विनोद रणावरे यांचा सत्कार करताना संजय राजगोळे,विलास पाटील आदी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तहसीलदारपदी विनोद रणावरे हे आज  कार्यालयात रुजू झाले. विद्यमान तहसिलदार शिवाजी शिंदे यांची वेल्हा (जि.पूणे) यैथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्या पदावर विनोद रणावरे याची नियूक्ती करण्यात आली आहे. रणावरे हे यापूर्वी सोलापूर उत्तर मध्ये तहसीलदार  होते. पुनर्वसन खात्यातही त्यानी सेवा बजावली आहे. आज चंदगड तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला नंतर चंदगडमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी चंदगडचे मंडल अधिकारी अशोक कोळी, उपलेखपाल संजय राजगोळे, प्रवीण खरात, बापूसाहेब देसाई, महसूल अव्वल कारकून विलास पाटील, पुरवठा अधिकारी सचिन गाडीवड्डडर,  चंदगड तलाठी संजय सरोळकर, हेरे तलाठी सुरेश जुवेकर,  लिपिक जी. एन. मेघमाळे, राजेंद्र कबुली, नितीन कांबळे आदीसह चंदगड तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment