डॉ. बांदिवडेकर फौंडेशनच्या मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2019

डॉ. बांदिवडेकर फौंडेशनच्या मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

डॉ.बांदीवडेकर फौउंडेशनच्या वतीने आयोजित मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्या बक्षिस वितरण करताना 
डॉ. सौ. मधुबाला प्रकाश बांदिवडेकर व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
डॉ. प्रकाश बांदीवडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बांदीवडेकर फौउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चंदगड येथील फौउंडेशनच्या आवारात डॉ. सौ. मधुबाला प्रकाश बांदिवडेकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदीवडेकर होते.
17 फेब्रुवारी 2019 रोजी डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड येथे संपन्न झाला. या दिवशी त्यांच्या फौडेशनच्या वतीने दिवसभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. आरोग्य शिबिर, महिलांना साड्यांची भेट, मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप, अपंगांना व्हीलचेअर वाटप, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, भव्य मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत 70 पुरुष तर 32 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पात्र ठरलेल्या खासदार उदयनराजे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येणार होती. मात्र वेळे अभावी प्रचंड गर्दीमुळे हे नियोजन शक्य झाले नसल्याने या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना नुकताच डॉ. मधुबाला प्रकाश बांदिवडेकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. पुरुष स्पर्धेत पहिला रामकृष्ण नाईक तर दुसरा क्रमांक गजानन गावडे, तिसरा क्रमांक अविनाश चंदगडकर, उतेजनार्थ सुनिल सदावर ईराप्पा नाईक यांनी मिळवला.  महिला स्पर्धेतील कु. दिपाली चव्हाण, योगीता जरळी, निकीता देसाई यांनी अनुक्रम पहिला, दुसरा व तीसरा तर ज्योती गवस व अश्विनी गावडे यांनी उतेजनार्थ क्रमांक पटकावले. या दोन्हीही स्पर्धेच्या विज्येत्याना रोख रक्कम प्रत्येकी 5001,4001,3001,1001 रूपये व प्रशस्तीपत्र तसेच सन्मान चिन्ह डॉ. सौ. बांदिवडेकर यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले. यावेळी महेश फगरे, शितल भिवटे, रवि नाईक, जयवंत बिर्जे, आशाताई देवर्डे, संग्राम अडकूरकर, सातापा कांबळे, संजय मुळीक, विनायक इंगवले, आकाश चंदगडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment