दौलत कारखान्यासाठी तालुका संघामार्फत जिल्हा बँकेकडे सुधारित प्रस्ताव सादर - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2019

दौलत कारखान्यासाठी तालुका संघामार्फत जिल्हा बँकेकडे सुधारित प्रस्ताव सादर


चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालवण्यासाठी चंदगड तालुका संघाने काही अटी शिथिल करून कारखाना चालवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबतचा नवा प्रस्ताव जिल्हा बँकेला सादर केला आहे. तालुका संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखाना 40 वर्षे ऐवजी 38 वर्षे चालविण्याबरोबरच कर्जफेडही लवकर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेकडे तालुका संघाने दाखल केलेल्या पहिला प्रस्ताव दौलत कारखाना हा दौलतचे व  तालुका संघाचे सभासद चालवणार आहेत. दौलत कारखाना संघाने चालवण्यासाठी टेंडर भरल्यामुळे प्रथमतः सहकारी संस्था पुढे आल्याने सहकाराचा विचार करून संस्थेमार्फतच कारखाना चालवण्यासाठी प्राधान्य द्यावे. बँकेच्या 67.27 कोटी कर्जापोटी कंपनीला पैसे भरण्यासाठी दिलेल्या सवलती प्रमाणे 25 टक्के रक्कम 31 मार्च 2019 पर्यंत भरणार आहे. उर्वरित रक्कम 25 टक्के 30 सप्टेंबर 2019 पर्यंत भरणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम व व्याज समान पाच हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी त्या रकमेची बँक गॅरंटी घेण्याच्या अटीस अधिन राहून समर्थपणे कारखाना चालवण्यास सक्षम आहे. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर बँक, शेतकरी, सभासद, कामगार या घटकांची संघ व्यवस्थापनासमवेत कारखाना सुरळीत चालविण्यासाठी बैठक घेत आहोत. थकित नवीन एफ. आर. पी. शुगर केन बिल 1.85 कोटी तत्काळ देऊ, तसेच कामगार संघटनेशी चर्चा करून थकित पगार बाबत निर्णय घेणार आहे. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर दर महिन्याचा पगाराची हमी देत आहे.  संचालक मंडळाच्या निर्णयानंतर बँकेचे पैसे संघाने भरल्यानंतर ताबा कायदेशीर व रीतसर प्राप्त झाल्यानंतर कारखान्याचे मेंटेनन्स, ऊस तोडणी करार व इतर कामांसाठी संघ मोठी रक्कम गुंतवणार आहे. न्युट्रीयन्स कंपनी न्यायालयात गेली आहे. त्याबाबत कायदेशीर आर्थिक अडचण निर्माण झाल्यास बँकेने त्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे करार होईल. यामध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात यावा. निविदेसोबत संघाचे आर्थिक विवंचनपत्र जोडली आहेत. तालुका संघ दौलत कारखाना 38 वर्षे चांगल्याप्रकारे चालवून दाखविल. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हा बँकेने तालुका संघाला दौलत कारखाना चालवायला द्यायची निविदा मंजूर करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा बँकेला तालुका संघाच्या वतीने देण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment