चंदगड / प्रतिनिधी
दिंडलकोप (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अध्यक्ष चषक स्पर्धेत यश मिळविले.
योगिता जरळी हिने वरिष्ठ गटात 400 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व 600 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात द्वीतीय क्रमांक मिळवला मिळविला. कनिष्ठ गटात सुजाता जरळी हिने लांब उडी प्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तानाजी जाधव, सुभाष पाटील, श्रीकांत पाटील, सुनील देसाई, देवाप्पा कोकितकर, अब्दुलरहीम मुजावर, बाळू प्रधान, सोनाप्पा कोकितकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पाच्छासो काझी, अब्दुलहमीद मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment