धुमडेवाडी येथे रविवारी विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2019

धुमडेवाडी येथे रविवारी विविध विकास कामांचा शुभारंभ


चंदगड / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे रविवार 10 फेब्रुवारी 2019 रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती माजी सभापती शांताराम पाटील यांनी दिली.
माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माजी आमदार संजय पाटील व सुरेश घाडगे करतील. ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भारत पाटील, नळपाणी योजनेचे उद्घाटन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तर जय हनुमान व्यायाम शाळेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी सभापती शांताराम पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सरपंच पार्वती पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment