चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पेपर एजंट विक्रेते संघटनेची बैठक चंदगड येथील रवळनाथ मंदिरात अध्यक्ष संजय राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
स्वागत सचिव संजय कुट्रे यांनी केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, राज्यभर वृत्तपत्र विक्री यांचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर नोंदणी करावी, विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी स्टॉल साठी जागा उपलब्ध करून द्यावी, सध्या सुरू असलेले स्टॉल अस्तित्वात धरूनही घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, प्रत्येक जिल्ह्यात वृत्तपत्र भवन उपलब्ध करावे, रेल्वे स्टेशन व बस स्टॉप वरील पेपर स्टॉल साठी प्रामुख्याने विचार करावा, विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, 60 वर्षावरील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन योजना लागू करावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन योजना व मेडिकल सुविधा लागू करावी , वृत्तपत्र विक्रेत्यांचा मुलांना शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यांसाठी सरकारी दरबारी पाठपुरावा करण्याचे ठरले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा ठराव यावेळी झाला. यावेळी सुधीर मांजरेकर, मारुती बेनके, रवळू पाटील, संदीप बांदेकर, अरविंद देशपांडे, जोतिबा मांडेकर, नामदेव, परशराम पाटील, काशिनाथ जाधव, रामचंद्र कांबळे, सुभाष गावडे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment