चंदगड / प्रतिनिधी
समाजमन निकोप ठेवायचे असेल तर भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करणे ही काळाची गरज आहे. भारतीय लोककलेमध्ये वास्तवतेचे दर्शन घडते. त्यामूळे लोककला जतन करुन भारतीय संस्कृतीचा आदर्श जगासमोर ठेवा असे प्रतिपादन माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यानी केले. डुक्करवाडी (रामपूर) येथे साके (कागल) येथील सोंगी भजनाच्या उद्धाटन प्रस॔गी बोलत होते.
दिपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले. कलाकारांना शुभेच्छा बाबुराव वरपे यानी दिल्या. यावेळी ह. भ. प. धोंडीबा वरपे यांनी सर्वांचे फेटा व हार, पुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी लाकुरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सगोजी तुपारे, सरपंच राजू शिवणगेकर, तंटामुक्त अध्यक्ष राघोबा वरपे, माजी उपसरपंच गजानन ढेरे, ह. भ. प. दत्ताञय देशमुख, ह. भ. प. बाळू सुतार, ह. भ. प. पांडुरंग काकडे, माणगांवचे सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवणगेकर, ज्ञानेश्वर काकडे यांच्यासह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक बाबुराव वरपे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर वरपे यांनी मानले.
No comments:
Post a Comment