बेळगाव-वेगुर्ला मार्गावर रस्त्याकडेला धुळीचे साम्राज्य - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2019

बेळगाव-वेगुर्ला मार्गावर रस्त्याकडेला धुळीचे साम्राज्य

बेळगाव-वेगुर्ला मार्गावर रस्त्याकडेला टाकलेल्या मातीमध्ये धुळ उडून त्रास होत आहे. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
बेळगाव -चंदगड मुख्य मार्गावर एका बाजुने चर खुदाईचे काम सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकी वाहण धारकांना वाहण चालवत असताना डोळयात धुळ जाऊण इजा होत आहे.एखादे मोठे वाहण वेगाने गेल्यास संपुर्ण धुळीचे साम्राज्य पसरूण काही वेळ समोरचे दिसायचे बंद होते. त्यामुळे लहाण मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
दुरध्वणी व मोबाईल कपंणीने आपला विस्तार वाढवण्यासाठी केबल टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. बेळगांव ते वेगुंर्ला ह्या मुख्य मार्गाच्या एका बाजुने जेसीबी मशिनद्वारे खोल चर मारण्याचे काम जारात सुरु आहे. मुख्य रस्त्याला लागुणच चर खुदाई सुरू असल्याने चरीतील काढलेली माती मुख्य रस्त्यावर टाकली जात आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याचा अर्धा भाग मातीने व्यापला आहे.त्यामुळे ह्या मार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळ डोळ्यात जाऊण वाहणधारक तसेच इतर या मार्गावरूण ये जा करणाऱ्या व्यक्तिंना नाहक त्रास सहण करावा लागत आहे. दिवसभर चर खुदाईचे काम सुरू असते. रात्रीच्या वेळी बंद. रस्त्याच्या लागुन चर असल्याने वाहणधारकांना कोणताच अदांज येत नाही. त्यामुळे सुरक्षा म्हणुन रात्रीच्या वेळी तिथे बोर्ड कींवा सुरक्षा सिग्णल लावणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.


No comments:

Post a Comment