शिवसेनेच्या कामगार व युवासेनेच्या वतीने शालेयउपयोगी साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2019

शिवसेनेच्या कामगार व युवासेनेच्या वतीने शालेयउपयोगी साहित्याचे वाटप


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
नागरदळे (ता. चंदगड ) येथील प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना कामगार सेना व युवासेना यांच्या मार्फ़त शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक जीवनात हातभार लागावा व उत्तम विद्यार्थी तालुक्यात उदयास यावेत. या हेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना नेहमी समाजकारणात पुढे असते कै. बाळासाहेब  ठाकरे यांचे 80% समाजकारण आणि 20 % राजकरण या मुलमंत्राच्या उद्देशान आज सगळे पदाधिकारी काम करत आहेत. या प्रसंगी उपस्थित कामगार सेना तालुका  प्रमुख  कल्लापा निवगिरे,युवासेना तालुका प्रमुख प्रताप उर्फ पिणु पाटील,युवासेना उप तालुका भरमु उर्फ प्रदीप पाटिल, शाखा प्रमुख परशराम मुरकुटे, किरन कोकितकर, उमाजी पवार, मारूती सुतार, मोहन चौगले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment