![]() |
जान्हवी मोहनगेकर |
कोवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर ॲथलेटिक्स असोसिएशन मार्फत झालेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत किणी (ता. चंदगड ) येथील मराठी विद्या मंदिर शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी जान्हवी पांडुरंग मोहणगेकर हिने ६० मिटर व १०० मिटर धावणे स्पधेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कोल्हापूर क्रीडा संकुलन येथे स्पर्धा झाल्या. डेरवन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धसाठी तिची निवड झाली आहे. तिला मुख्याध्यापक ए.के. पाटील व वडील पांडूरंग मोहनगेकर यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment