हिंडगाव मध्ये जवानांना श्रद्धांजली देऊन शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2019

हिंडगाव मध्ये जवानांना श्रद्धांजली देऊन शिवजयंती साजरी

हिंडगाव येथील शिवजयंती कार्यक्रमात ऎतिहासिक पोषाख परिधान करुन सहभागी झालेले बालचमू. 
चंदगड / प्रतिनिधी 
हिंडगाव (ता. चंदगड) या गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऎतिहासिक पोषाख परिधान करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  पारगड ते हिंडगाव हा 45 किलोमीटरचा चालत प्रवास करून ज्योत आणण्यात आली. यावेळी गावातून ही ज्योत प्रत्येक गल्लीतून फिरवण्यात आली. छत्रपतीच्या घोषणांनी संपूर्ण हिंडगाव गाव दुमदुमले होते. यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवजयंतीचे नियोजन भरत भोसले यांनी केले होते. चंदगड लाईव्हशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

No comments:

Post a Comment