चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ, रविवारी सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2019

चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ, रविवारी सांगता

चंदगड येथील रवळनाथ यात्रेमध्ये पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले भाविक.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगडचे ग्रामदैवत व 84 खेड्यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव रवळनात यात्रेला यात्रेला सासनकाठी, आरती व पालखी मिरवणुकीसह आज मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेसाठी कर्नाटक गोवा व कोल्हापूरसह अन्य ठिकाणहून भाविकांनी यात्रेला हजेरी लावली होती. पुजारी विलास गुरव यांनी डोक्यावरुन आरतीसह मंदिराला घातलेली प्रदक्षिणा पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी केली होती. रविवारी (ता. 24) यात्रेची सांगता होणार आहे. 
डोक्यावरील आरती
खास यात्रेसाठी बाहेरगावी असलेले चाकरमानी यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. दुपारी साडेतीन वाजता प्रथम पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा झाली. त्यानंतर स्थानिक युवकांनी सासनकाठीने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी भाविक पालखी व सासनकाठीवर गुळ, खोबरे, बत्ताशे, चिरमुरे, लाडू यांची उधळण करत होते. गेल्या चार-पाच दिवसासूनच रवळनाथ मंदिराच्या परीसरात दुकानदारांनी दुकाने थाटली होती. 
सासनकाठी
लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बाहेरगावाहून फिरते पाळणे, घसरगुंडी यासह मनोरंजनाचे कार्यक्रम दिवसभर सुरु होते. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, हंबेरे, मांगलेवाडी, देसाईवाडी येथील गावची आज यात्रा असल्याने या गावातील लोक दिवसभर येथे थांबून होते. यात्रेमध्ये आईस्क्रीम, कलिंगड व सरबत यांच्या स्टॅालवर यात्रेकरुंनी झुंबड उडाली होती. यात्रेमध्ये महिलांची मोठी गर्दी केली होती. पालखी मिरवणूक मार्गात अडथळा येवू नये म्हणून स्वयंसेवक भक्तांनी मानवी कडे करुन भाविकांना सुचना देत होते. यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला असून गुरुवारी चाळोबा यात्रा, शुक्रवारी सातेरी व भावेश्वरी यात्रा व शनिवारी इटलाई यात्रा होते. चंदगड तालुक्यातील रविवारी स्थानिक लोकांच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो. त्यादिवशी यात्रेची सांगता होते. 



No comments:

Post a Comment