चंदगड तालुक्यात आमदार फंडातून विविध विकासकामांचा शुभारंभ करताना आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदाताई बाभुळकर, रामराज कुपेकर, बाबुराव हळदणकर, दयानंद काणेकर, गणेश फाटक व कार्यकर्ते. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील इनाम कोळींद्रे येथे पीकअप शेड बांधणे रूपये 3 लाख, काजिर्णे येथे पीकअप शेड बांधणे 3 लाख, आसगाव पैकी चुरणीवाडा येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे 5 लाख या कामांचा शुभारंभ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, ``आगामी काळात तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.`` डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, ``चंदगड तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या विकासापासुन वंचित राहिलेल्या वाड्यावस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील राहील. आजपर्यंत या तालुक्याच्या विकासासाठी संपुर्ण निधी दिला आहे. या भागाचा पर्यटन विकास व्हावा. यासाठी इसापुर ते चौकुळ व झांबरे ते बेरडवाडी हे रस्ते जोडण्यात आले आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर आपोआपच स्थानिक रोजगार वाढीस लागणार आहे. आपल्या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असुन येणाऱ्या काळात जनतेने विकास कामांबरोबर राहावे असे आवाहन केले.`` माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर म्हणाले, ``चंदगड तालुक्याच्या विकासाला स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पासुन सुरुवात झाली. तो विकासाचा वसा आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदाताई बाभुळकर चालवत आहेत.`` यावेळी गोकुळचे संचालक रामराज कुपेकर, चंदगड तालुका संजय गांधी निराधार अध्यक्ष बाबुराव हळदणकर, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, गणेश फाटक, सरपंच अंजली गावडे, सरपंच सविता कांबळे, रवळनाथ गावडे, राजाराम गावडे, रमेश कुट्रे, संजय गावडे, मारूती चिंचणगी, विठ्ठल गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment