संजय साबळे रवी पाटील महादेव शिवनगेकर |
कोवाड / प्रतिनिधी
मराठी
संघाच्या कार्याचा गौरव म्हणून तालुक्यातील तीन मराठी अध्यापकांचा विविध
पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक संजय
साबळे यांना डी. डी. आसगांवकर (कुडीत्रे, कोल्हापूर) उपक्रमशील शिक्षक
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती शाहू विद्यालय शिनोळीचे सीमाकवी
रविंद्र पाटील यांना राजा शिवछत्रपती पारगड सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. बागिलगे-
डुक्करवाडी विद्यालयाचे अध्यापक महादेव शिवणगेकर यांना कोल्हापूर जिल्हा मराठी
प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकीकडे
इंग्रजी मध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले असताना मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये
विविध उपक्रमांनी विद्यार्थांमध्ये गोडी लावण्याचे चंदगड तालुक्यातील अनेक
शिक्षक करत आहेत. विविध हायस्कूलमधून काव्य वाचनाचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थांमध्ये
काव्यलेखनाची व काव्यवाचनाची आवड निर्माण करणे. सीमाभागातील साहित्य संमेलनात
विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी निर्माण करून देणे, आकाशवाणीवर कथाकथनाचे कार्यक्रम आयोजन
करणे, मुलांकडून
विविध पुस्तकांचे लेखन करून घेणे, त्याचबरोबर चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाकडून वर्षभर हस्ताक्षर स्पर्धा, निबंधस्पर्धा यासारख्या स्पर्धाचे
आयोजन करून विद्यार्थांच्या लेखन कौशल्यास प्रेरणा देण्याचे काम केले जात आहे. पाच
वर्षापूर्वी माध्यमिक शिक्षकांची मराठी विषयाची चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ ही
संघटना स्थापन करुन याद्वारे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. या
पुरस्कारांनी मराठी अध्यापकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढेही
आपण मराठी अध्यापक संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून तालुक्यात बालसाहित्य
संमेलन भरविण्याचा मानस पुरस्कार विजेत्यांनी बोलून दाखविला.
No comments:
Post a Comment