गंधर्वगड श्री चाळोबा देवाची रविवारी व सोमवारी यात्रा, लोककला महाराष्ट्राची कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2019

गंधर्वगड श्री चाळोबा देवाची रविवारी व सोमवारी यात्रा, लोककला महाराष्ट्राची कार्यक्रमाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
गंधर्वगड (ता. चंदगड) येथील श्री चाळोबा देवाची यात्रा तयार 24 व सोमवार 25 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. रात्री अकरा वाजता कवलापूर (ता मिरज, जि. सांगली) येथील लोककला महाराष्ट्राची हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

यामध्ये भारुड, भेदिक, पोवाडा, गोंधळ, वाघ्या-मुरळी, कडकलक्ष्मी, विनोदी नाटक, पोतराज, शेतकरी गीत, वासुदेव, बतावणी, लावणी, कोळी गीत, देशभक्तीपर गीते, गौळणी अनेक विनोदी लोकरीचा कार्यक्रम होणार आहे. पहाटे चार वाजता पालखी सोहळा होणार आहे. सोमवार 25 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.


No comments:

Post a Comment