हलकर्णी व कोवाड येथे पेन्शनरांचा रविवारी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2019

हलकर्णी व कोवाड येथे पेन्शनरांचा रविवारी मेळावा


चंदगड / प्रतिनिधी
दौलत साखर कारखाना पेन्शनर,ईपीएस९५ च्या सर्व पेन्शनर व मुंबई गिरणी कामगार यांनी येत्या रविवार दि २४ फेब्रुवारी रोजी विविध विषयांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवारी दुपारी १२ वाजता कोवाड येथे गणपती मंदिर तर हलकर्णी येथे दुपारी ३ वाजता कारखाना साईट जवळील गणपती मंदिर परिसरात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पेन्शन वाढ,मुंबई कामगारांच्या घराबद्दल व महत्त्वाच्या इतर विषयावर सविस्तर मार्गदर्शन व चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्याला कॉ. अतुल कोकीतकर, र्कॉ. कृष्णांत अत्याळकर, काँ. अनंत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पेन्शनर बांधवांनी वेळेत उपस्थित राहावे असे सिध्दार्थ पाटील, जानबा बोकडे,गोपाळ गावडे, बाबुराव पाटील, वसंत गणाचारी यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment