चंदगड नगरपंचातीच्या सतरा जांगासाठी आरक्षण जाहीर, नऊ महिलांना संधी - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2019

चंदगड नगरपंचातीच्या सतरा जांगासाठी आरक्षण जाहीर, नऊ महिलांना संधी

चंदगड तहसिल कार्यालयात चंदगड नगरपंचायतीच्या आरक्षण सोडत काढताना तहसिलदार शिवाजी शिंदे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, नायब तहसिलदार डी. एम. नांगरे व इतर.
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड नगरपंचायतीसाठीच्या सतरा प्रभागासाठी आज दुपारी येथील तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या उपस्थितीत चिठ्या टाकून आरक्षण जाहीर करण्या आले. सतरा प्रभागामध्ये आरक्षण सोडतीनंतर नऊ महिलांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही, ते थेट मुंबईहून जाहीर होणार आहे. तहसिलदार शिवाजीराव शिंदे व नायब तहसिलदार डी. एम. नांगरे उपस्थित होते. 
चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळविण्यासाठी चंदगडकरांनी एकजुटीने लढा देवून नगरपंचायत मंजूर करुन घेतली आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचाली नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरु आहेत. आरक्षण सोडतीनंतर या हालचालींना आता गती येणार आहे. आरक्षण सोडतीनंतर लोकांच्यामध्ये उमेदवार कोण असतील याबाबत तर्कवितर्काच्या चर्चा रंगल्या आहेत. कु. देसाई या लहान मुलाच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गातून तीन तर सर्वसाधारण मधून पाच महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे चंदगडच्या नूतन नगरपंचायतीमध्ये सद्यातरी महिलांचे बहुमत असल्याचे दिसते. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. ते थेट मुंबईहून जाहीर होईल. त्यामुळे त्याला अजून काही दिवस तरी अवकाश आहे. यावेळी यावेळी चंदगड जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, राजेंद्र परीट, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, रामु पारसे, चंद्रकांत दाणी, बाळासाहेब हळदणकर, एस. आर. देशमुख, रवि कसबल्ले, अभयसिंग देसाई, समीर पिळणकर, प्रविण वाटंगी, सचिन नेसरीकर, तजमुल फणीबंद, ख्वाजा नाईक, फिरोज मुल्ला, झाकीर नाईक, प्रमोद कांबळे उपस्थित होते.
प्रभागानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. 1, 2, 5, 6, 12, 14 या प्रभागासाठी सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्र. 3, 10, 17 यासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. 4, 9, 13, 15, 16 – सर्वसधारण (महिला) व प्रभाग क्र. 8, 11 – नागरीकांचा मागास प्रवर्ग. 

No comments:

Post a Comment