दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून होत असून 20 मार्चपर्यंत हि परीक्षा चालणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी, शिक्षकांनी केंद्र संचालकांकडे मोबाईल जमा करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेपूर्वी अर्धातास आधी उपस्थित राहणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी निळा आणि काळा शाईच्या पेन वापरण्यास परवानगी आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई आहे. पेपरची अदलाबदल होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोड आहेत. तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथक लक्ष्य ठेऊन असणार आहे.
चंदगड लाईव्ह न्यूज मार्फत बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment