किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करताना उद्योजक रमेशराव रेडेकर, आदित्य रेडेकर व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
जि. प. सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांनी आपल्या "क" वर्ग पर्यटन स्थळ विकास निधी मधुन किल्ले पारगड ता.चंदगड येथे भगवती मंदिराच्या परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी रुपये पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ भाजपा नेते व उद्योजक रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर, किल्ले पारगड जनकल्याण समितीचे अध्यक्ष .कान्होबा माळवे, वसंत नांगरे, संजय मणेरीकर, श्री. जोशी, विठ्ठल शिंदे, प्रकाश चिरमुरे, राघोबा शिंदे, विलास आढाव, पोलीस पाटील नारायण गडकरी, गोविंद कांबळे, धोंडीबा जांभळे, जयवंत मालुसरे, रघुवीर शेलार, भरत बोर्डे, नामखोलचे दत्ताराम पोवार, माजी सैनिक के. व्ही. पोवार, युवराज जाधव, एल. टी. नवलाज, नितीन फाटक, नितीन होरंबळे, प्रवीण होडगे, मोहन पाटील उपस्थित होते. आभार कान्होबा माळवे यांनी मानले.
No comments:
Post a Comment