संधी मिळाल्यास दौलतला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ - राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2019

संधी मिळाल्यास दौलतला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ - राजेश पाटील

जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या उद्गाटन प्रसंगी राजेश पाटील व ग्रामस्थ. 
तेऊरवाडी /  प्रतिनिधी
चंदगड तालूक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेला दौलत कारखाना चालवण्याची संधी मिळाल्यास दौलतला पुन्हा पूर्वीप्रमाणे गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे आश्वासन तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यानी दिले. जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. पी. डी. पाटील होते. प्रमूख पाहूणे म्हणून जि. प. सदस्य अरूण सुतार होते . यावेळी अरूण सुतार यांच्या हस्ते अंगणवाडीला खेळण्यांचे वाटप करण्याप आले. केडीसीसी संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाबूराव वर्पे यानी भटक्यांची शिक्षण परिषद घेतल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच नारायण पाटील, माजी सरपंच विष्णू पाटील, गोविंद पाटील, वर्षा पाटील, वैशाली पाटील, अर्पिता पाटील, पोलिस पाटील सौ .पाटील, ग्रामसेविका मिनाक्षी रायगुडे, उत्तम पाटील, शिवाजी पाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच प्रा .पी. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बाबूराव वर्पे तर आभार डॉ . विश्वनाथ पाटील यानी मानले.

फोटो -  मुरकुटेवाडी येथे रस्ता कामाचे उद्घाटन  करताना राजेश पाटील , सोबत जि .प. सदस्य  अरूण सुतार , सरपंच प्रा . पी .डी. पाटील

No comments:

Post a Comment