![]() |
खानापूर (ता. आजरा) येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ करताना. |
आजरा / प्रतिनिधी
मौजे खानापूर (ता. आजरा) येथे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निधीतून रुपये ५ लाखांचा निधी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी उपलब्ध करून दिला. या कामाचा शुभारंभ जि. प. सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर व कारखाना अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते पार पडला. चंद्रकांत दादांनी दिलेला शब्द पाळला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच पुनम गुरव, उपसरपंच युवराज जाधव ,सदस्य ज्ञानदेव जाधव,प्रभावती गुरव,कल्पना डोंगरे, विलास नाईक,दशरथ अमृते,शेंडे,प्रल्हाद गुरव, पुंडलिक धनवडे,रणजित सरदेसाई, विलास भादवणकर, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, रघुनाथ जाधव,धोंडीबा तेंडुलकर,प्रकाश दोरुगडे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एन.जी.गुरव सर यांनी केले तर आभार गौतम कांबळे सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment