नंदकुमार ढेरे संतोष सुतार निवृत्ती हारकारे संतोष सावंत-भोसले |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या चार पत्रकारांची निवड गारगोटी तालुक्यातील शेनगाव येथील स्वराज्य कल्यान सेवाभावी संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी झाली आहे. यामध्ये चंदगड तालुका पत्रकार संघातील तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे (प्रतिनिधी, दै लोकमत) यांची स्वराज्य समाज भूषण पुरस्कार, संपर्क प्रमुख संतेाष सुतार (चंदगड न्युज लाईव्ह प्रतिनीधी यांची स्वराज्य आदर्श इलेकट्रॉनिक माध्यम पुरस्कारासाठी तर निवृत्ती हारकारे यांची स्वराज्य आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी व संतोष सावंत-भोसले (सा. चंदगड टाईम्स, संपादक) यांची स्वराज्य आदर्श साप्ताहीकसाठी निवड करण्यात आली आहे. हे सर्व पत्रकार चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत. याच बरेाबर तुडये येथील रामलींग सार्वजनिक वाचनालयाला स्वराज्य आदर्श वाचनालय पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. या सर्वांना समारंभ पूर्वक शनिवारी शेनगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या सर्वांचे विषेश कौतुक केले जात आहे.
1 comment:
Tu fakt rajkarnkar gavatkay chaluahe tepan jagala sangunaka
Post a Comment