चंदगडी नाटय महोत्सवाला उदंड प्रतिसाद, तालुक्यातील नाट्यप्रेमी सुखावले - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2019

चंदगडी नाटय महोत्सवाला उदंड प्रतिसाद, तालुक्यातील नाट्यप्रेमी सुखावले

अशुद्ध बीजापोटी या नाटकातील एकच संवेदनशील प्रसंग
निवृत्ती हारकारे / मजरे कार्वे
१ फेब्रुवारी २०१९ते ६ फेब्रुवारी २०१९या कालावधीत भाषा विकास संशोधन संस्था हलकर्णी आयोजित चंदगडी नाटय महोत्सव प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने उत्साहात संपन्न झाला . या नाट्य महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ सिनेकलावंत व रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले . अध्यक्षस्थानी अजिंक्यतारा उद्योग समूहाचे प्रमुख अविनाश पाटील हे होते . प्रमुख अतिथी म्हणून गोकूळचे संचालक राजेश पाटील . माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील , भाजप कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील , अभिनेते अभिजित झुंजारराव उपस्थित होते .
चंदगडी नाट्य महोत्सवाचे सचिव , रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक परसू गावडे यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळाली पाहिजे व नाटय चळवळ दरवर्षी भरविली जाण्यासाठी नाटयप्रेमींनी प्रतिसाद दयावे असे आवाहन केले . पहिल्या नाटकाचे प्रायोजक राजेश पाटील यांनी नाटय महोत्सव सुरू करण्यासाठी तालुक्यातील तरुणांचे कार्य , त्यांची धडपड कौतूकास्पद आहे .तालूक्याचा मध्यवर्ती ठिकाणी मल्टीपर्पज हॉल उभारण्यासाठी मदत केली जाईल व येथून पुढील प्रत्येक नाट्य महोत्सवामध्ये एका नाटकाचे प्रायोजक स्विकारत आहे हे सांगून शुभेच्छा दिल्या .
उद्घाटनपर भाषणात भालचंद्र कुलकर्णी यांनी नाटक हे माणसे जोडण्याचे काम करते . चंदगड तालूक्यातील युवकानी नाटयमहोत्सवाला सुरूवात करून नाटय चळवळ पुढे चालू ठेवलेली आहे हे अभिमानास्पद आहे . नाटक हे कुणाची एकटयाची मिरासदारी नसून मुंबई- पूणे येथील नाटके व नाटकाचे लोण ग्रामीण भागात पोहोचले पाहिजे असे विचार व्यक्त करून निळू फूले , वि.वा. शिरवाडकर यांच्या नाटकांविषयींच्या आढवणीना ऊजाळा दिला .
यानंतर अभिनव नाट्य संस्था कल्याण ( मुंबई ) , लेखक निलीप जगताप , दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांच्या* *गस्त* या नाटकात निरअपराध लोकांचे खून करणाऱ्या मारेकरी माथेफिरुच्या शोधासाठी पोलिस , संघटना खून्याला पकड़णेसाठी चाललेला संघर्ष , पण मारेकरी सापडत नाहीत . या सद्यस्थितीवर भाष्य करणारे उत्तम नाटक सादर केले .कलापरिवर्तन नाटयसंस्था , कोल्हापूर मार्फत सादर केलेले विद्यासागर अध्यापक लिखित किरणसिंह चव्हाण दिग्दर्शित फ्रेंच राजक्रांतीवर आधारित अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव करून प्रजासत्ताकची स्थापना करून जगाला स्वातंत्र्य , समता , बंधूता या मूल्यांची देणगी दिली . त्यावर आधारित ऱ्हासपर्व या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकलीच पण तत्कालिन वेशभूषा , ड्रेपरी , परिस्थितीचा अनुभव प्रेक्षकांना दिला
साई कलामंच कुडाळ मार्फत लेखक व दिग्दर्शक केदार देसाई यांचे* *घोकंपट्टी डॉट कॉम* या नाटकात मध्यमवर्गीय शिक्षकांच्या जीवनातील संघर्षावर आधारित असून आपल्या कुंटूबाचे प्रश्न मिटविण्यासाठी चौकटमोडून बाहेर पडण्याची केविलवाणी धडपड मांडलेली आहे. उत्तम अभिनय . विनोदी तसेच काळजाला भिडणारे संवाद यामुळे प्रेक्षकांचे हात आपोआप हाताला भिडतात . यामुळे या नाटकाने वेगळीच उंची साधलेली आहे . हिरण्य नाटयसंस्था आजरा मार्फत लेखक व दिग्दर्शक डॉ . श्रद्धानंद ठाकूर यांनी न्यायाधीश व त्यांच्या घरी शिरलेल्या चोरावर आधारित* *अक्कड बक्कड* हे अमअभिनयाद्वारे रहस्यमय नाटक सादर केले .पण या नाटकाला नाट्यप्रेमींच्या समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या .
भाषाविकास संशोधन संस्था हलकर्णीमार्फत चंदगड तालूक्याचे हरहुन्नरी नाट्यकर्मी व दिग्दर्शक परसू गावडे यांनी भारतातील हिंदू - मुस्लिम जातीय दंगलीवर बेतलेले लेखक केदार देसाई यांचे *अशुद्ध बिजापोटी* या नाटकातून संवेदनशिल विषय सादर करुन समाजातील अनेक प्रशांना स्पर्श करत विचार प्रवृत्त केले . सर्व टीमनेच विशेषतःपरसू गावडे यांनी अलताफची भूमिका जीवंत साकारली अन प्रेक्षकांची मने जिंकली .न्याट्य महोत्सवाच्या अंतिम दिनी दादा कोंडके , निळू फूले , राम नगरकर यानी लेखक वसंत सबनिस यांचे वगनाट्य महाराष्ट्रात अजरामर करून ठेवले . तेच तुफान विनोदी नाटक वेगळ्या रंगात . वेगळ्या ढंगात प्रीयाज स्टुडिओज मंचर पूणेमार्फत परसू गावडे दिग्दर्शित  व त्याच्यासह  तेवढयाच गुणवंत क्लाकारांनी साभारलेला विनोदी अभिनयाविष्कार सर्वांच्या पसंतीत उतरला .
वरील सर्व जिल्हा व राज्यस्तरीय नाट्य स्पधेत गौरवलेल्या नाटकांना राजेश नरसिंगराव पाटील , विशाल गोपाळराव पाटील .सौ. ज्योति ताई दिपकराव पाटील . गोकूळ दूध संघ , सचिन पाटील एम.डी.आर .डी. ( एल .आय .सी. ) उद्योजक धनाजी मुंगारे ,,हे प्रायोजक म्हणून लाभले . त्याचबरोबर एकनाथ पाटील ( तात्या ) अविनाश पाटील , आर .पी. कांबळे , गजानन राऊत, जनार्दन पाटील -खवनेवाडकर . संतोष बांदिवडेकर, विष्णू गावडे , एस .एल . बेळगांवकर यांनी नाट्य महोत्सवाला देणगी देऊन हातभार लावला . चंदगडी नाटय महोत्सव यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणारे कमिटीचे अध्यक्ष अविनाश पाटील , उपाध्यक्ष डॉ .नंदकुमार मोरे , सचिव परसू गावडे . खजिनदार मनोहर चांदेकर . धनाजी पाटील , आर . आय . पाटील , विष्णू गावडे , युवराज कागणकर , अनिल पाटील , संदेश आवडण , दिगंबर दोरूगडे , भरत गावडे , प्रकाश सुतार , सुधाकर पाटील , विजय मोरे , सौ . गितांजली पाटील - गावडे , सौ . प्रियदर्शनी फलके- मोरे यांचे फार मोठे योगदान लाभले. तसेच एकनाथ पाटील, प्रा .पी.सी. पाटील , प्रा . सुनिल शिंत्रे  , दिपकराव भरमू पाटील अॅङ . दिग्विजय कुऱ्हाड सह अनेक हितचिंतक मान्यवरांचे प्रोत्साहन लाभले . हा नाटय महोत्सव चंदगड , आजरा, गडहिंग्लज , बेळगाव येथील नाट्यरसिकांच्या उदंड प्रतिसादामुळेच संपन्न झाला. आभार धनाजी पाटील यांनी मानले.
निवृ्त्ती हारकारे, कारवे


No comments:

Post a Comment