राज्यस्तरीय युवा संगीत रत्न पुरस्कारासाठी समृद्ध कांबळेची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2019

राज्यस्तरीय युवा संगीत रत्न पुरस्कारासाठी समृद्ध कांबळेची निवड

राज्यस्तरीय युवा संगीत पुरस्कार 2019 सिने अभिनेत्री, अलका कुबल यांचे हस्ते स्वीकारताना समृद्ध राजाराम कांबळे,, शेजारी रेखा पाटील. डॉ .एस. बी. पाटील व मान्यवर.
कोवाड़ / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील समुद्ध राजाराम कांबळेची निवड राज्यस्तरीय युवा संगीत रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. गडहिंग्लज येथील साप्ताहीक रणरागिनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांपैकी            राज्यस्तरीय युवा संगीत रत्न पुरस्कारासाठी चंदगड तालुक्यातील समृद्ध राजाराम कांबळे याला मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते तर साप्ताहीक रणरागीनीच्या संपादीका रेखा पाटील, डॉ. एस. बी. पाटील यांच्या उपस्थितित देण्यात आला. 
समृद्ध कांबळे हा मुळचा चंदगड तालुक्यातील कोरज या गावचा असुन तो सद्या महागांव (ता. गडहिंग्लज) येथील जय भारत हायस्कूलमध्ये तो दहावीच्या वर्गात शिकतो आहे. त्याला गडहिंग्लज येथील स्वरसाधना संगीत महाविद्यालयातील संगीत शिक्षक प्राचार्य मछिंद्र बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. समृद्धने बालवयातच संगीत शिक्षणाचे धड़े गिरवून अनेक शास्त्रीय संगीत मधील परीक्षा दिल्या आहेत. दुबईमध्ये संपन्न झालेल्या सांस्कृतिक महोत्सव मधील सुवर्ण पदकाबरोबरच गोवा, महाराष्ट्र, दिल्ली, हैद्राबाद मुंबई या ठिकाणी संगीत महोत्सव मधून शास्त्रीय संगीतमध्ये दैदीपमान यश संपादन केले आहे. लवकरच त्याच्या "हर एक तारा "या अलबमचे प्रकाशन होणार आहे. त्याबरोबरच झी टी व्ही वरील "सुर नवा ध्यास नवा "यामधे देखील त्याने मेघा ऑडिशन पासून दुसऱ्या फेरी पर्यन्त यशस्वी मजल मारली. त्याचा या यशाचे फलित म्हणून त्याची शास्रीय संगीतच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार, दिल्ली CCRI ची स्कालरशिप प्राप्त झाली आहे. त्याने संगीत क्षेत्रातील यश हे ग्रामीण भागातील विद्यार्था ना नक्कीच प्रेरणा देणारे आहे. त्याच्या या यशा मध्ये त्याच्या आईं-वडील यांच्या बरोबर आजोबा यांचे देखील योगदान आहे असे तो मानतो. या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


1 comment:

Unknown said...

Keep it up samruddh.

Post a Comment