शहीद भगतसिंग यांच्या 125 व्या स्मृतिदिनी प्रा. नवनाथ शिंदे यांनी सादर केला 125 वा एकपात्री प्रयोग - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2019

शहीद भगतसिंग यांच्या 125 व्या स्मृतिदिनी प्रा. नवनाथ शिंदे यांनी सादर केला 125 वा एकपात्री प्रयोग

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे शहीद भगतसिंग यांच्या 125 व्या स्मृतिदिनी एकपात्री प्रयोग सादर करताना प्रा. नवनाथ शिंदे.
माणगाव / प्रतिनिधी
थोर देशभक्तांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरावा, यासाठी त्यांच्या कार्याची ओळख आजच्या तरुणांना व्हावी यासाठी आत्तापर्यंत  700 पेक्षा अधिक  एकपात्री प्रयोग सादर करणारे ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यिक प्रा.डॉ. नवनाथ शिंदे यांनी शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या आजच्या 125 व्या स्मृतिदिनी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही .के. चव्हाण पाटील महाविद्यालयात शहीद भगतसिंग हा 125 वा एकपात्री प्रयोग सादर करून थोर देशभक्तांना आदरांजली अर्पण केली .
एकपात्री प्रयोगाला उपस्थित श्रोते.
इंग्रज सरकारच्या  150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारतीय जनतेचे  साखळी दोर तोडण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली .त्यापैकी शहीद भगतसिंग ,सुखदेव व राजगुरु यांचा 23 मार्च हा 125 वा स्मृतिदिन. या दिनाचे औचित्य साधून आजरा महाविद्यालयाचे ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यीक प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी शहीद भगतसिंग या एकपात्री नाटकाचा 125 वा प्रयोग चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्हि.के चव्हाण पाटील महाविद्यालय येथे सादर केला. आज देशात वाढलेल्या सैराचार व परकिय आक्रमणे  यामुळे आजच्या  तरुणाला थोर पुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी संत गाडगेबाबा, संत तुकाराम ,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सिद्धार्थ गौतम बुद्ध या भूमिका साकारत महाराष्ट्रात 700 पेक्षा अधिक एकपात्री प्रयोग सादर करून समाज प्रबोधनाचे कार्य केले. आज शहीद भगतसिंग यांच्या 125 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून " शहीद भगतसिंग " हा 125 हवा एकपात्री प्रयोग सादर करून क्रांतिकारी आठवणींना उजाळा दिला व  स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिद तरुणांच्या कार्याची ओळख महाविद्यालय विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य एस.ए,पाटील ,प्रा. ग.गो. प्रधान , प्रा. गजानन पाटील , उपस्थित होते. विद्यार्थ्यांना एक तास नाट्यप्रयोगातून शहीद जवानांची आठवण करून देताना संपूर्ण हॉल मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जी.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रा.शिला देशमुख यांनी मानले.






No comments:

Post a Comment