कालकुंद्रीतील राजेवाडी युवा मंडळाकडून पुस्तके भेट - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2019

कालकुंद्रीतील राजेवाडी युवा मंडळाकडून पुस्तके भेट

कालकुंद्रीतील राजेवाडी युवा मंडळाकडून पुस्तके भेट
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील राजेवाडी युवा मंडळाने गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला २९ पुस्तके भेट दिली. या "पुस्तकप्रदान" कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र पांडुरंग पाटील होते. प्रास्ताविक व्ही. आर. पाटील यांनी केले.
या युवकांनी पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबवला. या युवा मंडळाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी  राजेवाडी युवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सेक्रेटरी तुलशीदास जोशी, अजित खवणेवाडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत के. जे. पाटील व विलास शेटजी यांनी केले. वाचनालयाचे सर्व सदस्य यांच्यासह गजानन पाटील, अशोक वर्पे, चंद्रकांत पाटील, सुखदेव भातकांडे, संजय पाटील, प्रा. रवी पाटील, युवराज पाटील, शंकर मुर्डेकर, दीपक कालकुंद्रीकर, अन्वर शेख इ. ग्रामस्थ, वाचक, विद्यार्थी उपस्थित होते. आभार शिवाजी खवणेवाडकर मानले.


No comments:

Post a Comment