![]() |
दौलतचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. जिल्हा बँकेने दौलत साखर कारखाना लिव्ह अँड लायसन्स बेसिसवर 38 वर्षाकरिता अथर्व इंट्राटेड प्रा. लि. या खाजगी कंपनीला दिलेल्या लेटर ऑफ इंट्रेड (IOI) बाबत सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय आज चंदगड तालुका संघाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वारंवार मागणी करूनही टेंडरच्या संदर्भात कोणतीही कागदपत्रे आम्हाला पुरवण्यात व देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यावरूनच त्यांचे उद्दिष्ट पारदर्शक नसल्याचे आम्हाला वाटते. अथर्व ही कंपनी कंपनी अॅक्ट खाली रजिस्टर असून त्याचे ऑडिट ऍड अकाउंट प्रमाणे त्यांची स्थावर मालमत्ता फक्त दोन लाख पन्नास हजार रूपये असल्याचे आढळून आले आहे. 31 मार्च 2018 अखेरच्या आर्थिक वितरण पत्रकाप्रमाणे सदर कंपनीचे नक्त मूल्य चंदगड तालुका संघा पेक्षा कमी आहे. त्यामुळे आम्हाला बँकेचा हेतू स्वच्छ वाटत नसलेने तालुक्यातील शेतकरी व दौलतचे सभासद, कामगारांचे हिताला पुन्हा धोका निर्माण होणार आहे. दौलतबाबत पुन्हा न्युट्रीएटंस् सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने वरील निर्णय घेण्यात आल्याचे आज संचालक मंडळाने जाहिर केले आहे.
No comments:
Post a Comment