कोवाड येथे ओलम ॲग्रोच्या वतीने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2019

कोवाड येथे ओलम ॲग्रोच्या वतीने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न

चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ओलम ॲग्रो इंडीया प्रा. लि. (हेमरस) व  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सभागृहात चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यात आला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रगतशील शेतकरी जोतिबा वांद्रे होते.
या मेळाव्यात चालू हंगामात नोंदीतील 200 हेक्टर क्षेत्र हुंमणी किडीने बाधीत झाल्याचा अभ्यास व शेतकरी निहाय याद्या कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल व मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी आपल्या विभागातील शेती गट कार्यालयामार्फत घेऊन भागातील शेतकऱ्यांचा फक्त ऊस घेणे. इतकाच उद्देश न ठेवता भागातील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने तात्काळ प्रयत्न म्हणून हा शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याचे सांगितले.
मेळाव्याला उपस्थित तीन तालुक्यातील शेतकरी. 
हुमणी कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना कृषि महाविद्यालय कोल्हापूर, किटक शास्त्रज्ञ पांडुरंग मोहीते यांचे दोन तास मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी दिडशेहे शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाला  प्राचार्य डॉ . निळपणकर,  कारखान्याचे मुख्य शेतीअधिकारी सुधीर पाटील, कारखान्याचे सर्व असि. मॅनेजर,  केन ऑफिसर, फिल्ड ऑफिसर व कृषी विभाग चंदगडचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment