लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिमा परिसरात वाहनांची कसून तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिमा परिसरात वाहनांची कसून तपासणी

होसूर (ता . चंदगड) येथे निवडणूक कर्मचारी व पोलिस वाहनांची तपासणी करताना.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून कर्नाटक - महाराष्ट्र सिमाभागात निवडणूक विभागाने करडी आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्याबरोबर पोलिस चोविस तास येथून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत आहेत. असा आदेश निवडणूक विभागाने दिल्यामुळे वाहनांची तपासणी केली जात आहे. होसूर (ता. चंदगड) येथे महाराष्ट्राचा तर कर्नाटक हद्दीवर बेकिनकरे (ता. बेळगाव) हद्दीत कर्नाटक पोलिसांचा तपासणी नाका आहे. होसूर तपासणी नाक्यावर दोन पोलीस, दोन महसूल विभागाचे अधिकारी तर एक फोटोग्राफर अशी यंत्रणा कार्यन्वीत आहे. येथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक मोठया वाहनांची तपासणी, त्याची नोंद आणि व्हीडीओ शुटींग घेतले जात आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक पोलीसांची तपासणी देखील सुरु आहे. शिनोळी, होसूर, नरगट्टे आदि परिसरात वाहन तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनावर निवडणूक विभागाची करडी नजर आहे. वाहनांची तपासणी होत असल्याने ज्या वाहनांची कागदपत्रे पूर्ण नाहीत असे चंदगड तालुक्यातील वाहनधारक बेळगावला जाण्याचे टाळत आहेत.



No comments:

Post a Comment