![]() |
संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने तासभर झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला. आज दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण होते. ऊष्म्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी सात वाजता विजेच्या कडकडाटाला सुरवात झाली. वादळी वारा व विजेचा कडकडाटासह सूमारे तासभर पावसाने झोडपून काढले. कानूर, चंदगड, नागनवाडी, दाटे, डूक्करवाडी, माणगाव, हलकर्णी, नांदवडे, कार्वे, शिनोळी या परिसरात पावसाने हजेरी लावली. ऐन शिमग्यात पडलेला पाऊस काजू, आंबा, ऊस, मका, भूईमूग, सूर्यफूल आदी पिकांना फाभदायक ठरला आहे.
No comments:
Post a Comment