![]() |
चंदगड येथे आयोजित भाजप व शिवसेनेच्या मेळाव्यावेळी बोलताना
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शेजारी गोपाळ पाटील, विजय देवणे, संजय मंडलिक व
संग्राम कुपेकर व इतर.
|
चंदगड / प्रतिनिधी
मोदींनी संसार केला नाही, त्यामुळे त्यांना महिलांचे दुख काय कळणार अशी टिका विरोधक करतात. मात्र त्यांनी संसार करणाऱ्या सात कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देवून महिलांचे कष्ट हलके करण्याच्या प्रयत्न केला. देशाच्या सीमा व देशात राहणारा माणूस महत्वाचा आहे. त्यामुळ देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सरकार पुन्हा निवडून द्या. तेथे एकटा महाडिक जावून देशाच्या सीमेचे रक्षण होणार नाही किंवा 370 वे कलम रद्द करण्यास एकटा महाडिक काय करणार. यासाठीच शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून द्या असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदाद पाटील यांनी केले. चंदगड येथे आयोजित भाजप व शिवसेनेच्या मेळाव्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, ``महाडिक हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांचा पराभव आता अटळ आहे. कोल्हापूरला 24 तारखेला रविवारी महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. हि सभा इतकी प्रचंड करणार की, फक्त निवडणुकीची औपचारीकता शिल्लक राहील. उभ्या महाराष्ट्रात या सभेची दखल घेतली जाईल. टीका करणाऱ्यांचा राजकारण हा त्यांचा धंदा आहे. आपल्या देशाला विदेशातून 6 लाख कोटीचे तेल आयात करावे लागते. या तेलात जर सत्तर टक्के इथेनाल वापरण्याची प्रणाली विकसित केली तर साडेचार लाख कोटी रुपये वाचतील. त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे.``
संजय मंडलिक म्हणाले, ``चंदगड हा सीमवर्ती भाग आहे. चंदगड तालुक्यातील लोक भगव्याचा सन्मान करतात. त्यामुळेच मागील निवडणुकीतही 19 हजारचे मताधिक्य मला मिळाले. कामाचा पत्ता नाही, विकासकामाचा आराखडा नाही. अशा खासदारांनी राजगोळी गाव दत्तक घेतले होते. तेथील रस्त्यावर एकटी बुट्टी खडी पडली नाही. हाच विकास म्हणायचा का? असा सवाल उपस्थित केला. कुठही हुडीक सापडणार नाही, महाडिक अशी गत सद्याच्या खासदारांची झाल्याचे सांगून चंदगडरांचे माझ्यावरील उपकार कधीही विसरणार नाही.`` आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवसेना-भाजप युतीच्या सरकाराने लोकाभिमुख कामे केली आहेत. केलेल्या कामावरच केंद्रात व राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करु असा विश्वास व्यक्त करुन केंद्रशासन व राज्यशासनाच्या विविध योजनांची माहीती दिली.``
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी लोक राष्ट्रवादीला विसरत आहेत. विकासकामांच्या भुलथापा देवून नेमका कोणाचा विकास करत आहेत. हे जनता ओळखून आहे. असे सांगून दौलत कारखाना आजारी म्हणून घोषित करुन दौलतवरील सर्व कर्ज माफ करावे अशी मागणी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर, गोपाळराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, गोकुळचे संचालक बाबा देसाई, रमेश रेडेकर, जि. प. सदस्या अर्चना चौगुले, जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, संज्योती मळवीकर, शांता जाधव, नामदेव पाटील, भरमाणा गावडा, दिलिप माने, भैय्या कुपेकर, बाळ कुपेकर, भावकु गुरव, सचिन पिळणकर, सुनिल काणेकर, सुधीर देशपांडे, चंद्रकांत दाणी, योगेश कुडतरकर, चेतन बांदिवडेकर, नितीन फाटक यांच्यासह भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment