![]() |
कोवाड महाविद्यालयात दीक्षांत समारंभात बोलताना डॉ जे एस बागी सोबत इतर मान्यवर. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपल्या सृर्जनशीलतेला वाव द्यावा. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या.पर्यावरण समतोल राखत कृषी जीवनात क्रांती करावी असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ डीओटी संचालक डॉ. जे. एस. बागी यांनी केले. कोवाड येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवीदान दीक्षांत समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. ए. एस. जांभळे होते.
![]() |
महाविद्यालयात दीक्षांत समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना पदवीदान करताना मान्यवर. |
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले. डॉ. बागी पुढे म्हणाले ``आई, वडील व आपले शिक्षक यांचा आदर करणारा विद्यार्थी आयुष्यात मोठा होतो. हे लक्षात ठेवून वाटचाल करा कमकुवत बाबींवर मात करून गुणवत्तेला वाव द्या व स्पर्धा परीक्षांना खंबीरपणे सामोरे जाऊन यश मिळवा. असा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ विद्या परिषद सदस्य सतीश घाळी, विद्या परिषद माजी सदस्य व संचालक पी. सी. पाटील, माजी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील, संस्था सचिव एम. व्ही. पाटील आदी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीदान करून गौरवण्यात आले. या प्रसंगी संचालक गुंडू सावंत, एम. जे. पाटील, याकूब मुल्ला, बी. के. पाटील, शाहू फर्नांडिस, ज्योतिबा वांद्रे, प्रा. एस. एम. पाटील आदींसह सर्व प्राध्यापक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने हजर होते. सुत्रसंचालन मोहन घोळसे यांनी केले. तर आभार प्रा. व्ही. आर. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment