कोवाड -बेळगाव मार्गावर रस्त्याकडेच्या झाडाना आगी लावण्यात आल्याने असे वृक्ष कोसळून पडत आहेत . |
तेऊरवाडी /प्रतिनिधी
कोवाड- बेळगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूना असणाऱ्या झाडांच्या खाली आगी लावण्यात येत आहेत. आकाराने प्रचंड वाढलेले निलगीरी व आकाशीची झाडे या आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. झाडाच्या बुंद्याखाली पडलेल्या सुक्या पाल्यामुळे अशा झाडांचे बुंधे पेटत आहेत. पेटलेल्या झाडाचा बुंधा जळाल्याने संपुर्ण झाड पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा झाडांना आगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालून रस्त्याकडेची वृक्षसंपदा वाचविण्याची गरज आहे. झाडाचा बुंदा पेटल्याने कमकुवत होवून झाडाचा भार न पेलल्याने अचानक रस्त्यावर कोसळते. अशा वेळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर हे झाड पडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कोवाड ते होसूरपर्यंतची जवळपास चाळीसहून अधिक झाडांचे बुंदे जळाले असल्याने ती झाडे कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळू शकतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे.
आग लागल्याने बुंद्याच्या ठिकाणी जळत असलेले झाड. |
पेटणाऱ्या झाडाला वाचविण्याचा प्रेस फोटोग्राफरचा केविलवाणा प्रयत्न
चंदगड लाईव्ह न्यूजचे प्रेस फोटोग्राफर कोवाड येथील संजय पाटील या मार्गावरून प्रवास करत होते. जळणारे झाडे पाहून त्यांना न राहवल्याने आपल्याकडे असणाऱ्या बिसलरी बाटलीतील पाणी जळणाऱ्या झाडांच्या बुंद्वयावर पाणी ओतून आग विझवली. आग पूर्णत : विझली तरीही अर्धवट जळालेले बुंदे असल्याने त्यातील एक वृक्ष आज सायंकाळी कोसळलाच. संजय पाटील यानी दाखवलेल्या या वृक्ष प्रेमाची चर्चा परिसरात होत आहे.
No comments:
Post a Comment