चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील रवळनाथ माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने मतदार दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चंदगड शहरातून हातात फलक घेवून जनजागृती फेरी काढली. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान लोकशाही हाच आधार, कोणतेही मत घालू नका बेकार, निर्भय होऊन मतदान करा, देशाचा सन्मान करा अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभातफेरी काढली. रवळनाथ विद्यालयापासून फेरीला प्रारंभ झाला. चंदगड शहर व बाजारपेठेतून चंदगड तहसील कार्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. याकामी मंडल अधिकारी अशोक कोळी, मंडल अधिकारी श्री. पोतदार, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, प्राचार्य आर. डी. कुंभार, व्ही. जी. पाटील, एन. एस. गावडे, आर. एम. पाटील यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment