चंदगड पोलिसांनी तालुक्यातील उमगाव येथे छापा टाकून हस्तगत केलेली 28 लाख 88 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु. |
चंदगड / प्रतिनिधी
उमगाव (ता.चंदगड)येथे एका शेतातील घरात ठेवलेल्या गोवा बनावट दारु साठा आज चंदगड पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या दारुची 28 लाख 88 हजार 640 रुपये कींमत आहे. गोल्डन आईस ब्लु फाईन कंपनीची हि व्हीस्की दारू आहे आठवड्यातील चंदगड पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. चंदगड पोलिसांना खबऱ्यकडून मिळालेल्या माहितीनुसार चंदगड पोलिसांनी आज उमगाव गावालगत असलेल्या शेतात संशयित यशवंत विठ्ठल गावडे यांच्या घरात गोवा बनावटीची गोल्डन व्हिक्सीचे 536 बाँक्स छापा टाकून ताब्यात घेतले. या दारूची एकूण किमंत अठ्ठावीस लाख अठ्ठ्याशी हजार सहाशे चाळीस रुपये आहे. पो. नि. श्रीप्रसाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरिक्षक पी. बी कदम.हवालदार कसेकर,नांगरे, दिलीपकुमार यसादे, अमोल निकम, रामदास कील्लेदार या पथकाने ही कारवाई केली. मात्र पोलिस कारवाईची कुणकुण लागताच संशयित यशवंत गावडे याने पलायन केले.
उत्पादन शुल्क विभाग करतय तरी काय?
चंदगड पोलिसांनी आठवड्यात ही दसरी मोठी कारवाई होय. पहिली कारवाई 14 मार्च रोजी शिरगाव येथील एका शेतातील घरावर छापा टाकून केली होती. या कारवाईत सुमारे साडे तेरा लाख रुपये कींमतीची गोवा बनावटीची दारू छापा टाकून हस्तगत केली होती. तर आज सोमवारी दुपारी उमगाव येथील सुमारे एकोणतीस लाखाची दारू पकडली. दोन्ही छाप्यात सुमारे साडे बेचाळीस लाख रूपये कींमतीची दारू पकडली. दैनंदिन कामे करुन चंदगड पोलिसांनी आठवड्यात दोन वेळा कारवाई केली. मग ऊत्पादन शुल्क विभाग करतय काय? असा सवाल केला जात आहे, तालुक्यातील बऱ्याच गावात गोवा बनावटीच्या दारुचा सुळसुळाट सुरू असून राजरोसपणे गावागावात गोवा बनावटीच्या दारुची विक्री सुरू आहे. अवैद्य दारु पकडण्यासाठी खास उत्पादन शुल्कच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या खात्यातील अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय असा सवाल केला जात आहे.
1 comment:
बनवा बनवी
Post a Comment