राष्ट्रीय एकात्मता शिबिरांमध्ये माडखोलकर महाविद्यालयाचे घवघवीत यश - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2019

राष्ट्रीय एकात्मता शिबिरांमध्ये माडखोलकर महाविद्यालयाचे घवघवीत यश

शिमोगा येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिरांमध्ये द्वितीय क्रमांकाची  ट्रॉफी स्विकारताना विद्यार्थ्यी व संघ व्यवस्थापक. 
चंदगड / प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प गव्हर्मेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज शिमोगा (कोयम्पु युनिव्हर्सीटी, कर्नाटक) येथे संपन्न झाला. 6 मार्च ते 12 मार्च 2019 या कालावधीत कॅम्पचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाने यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावत मानाची ट्रॉफी जिंकली. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे यामध्ये सर्वांधिक सात विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. 
राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पच्या सात दिवसांच्या राष्ट्रीय कॅम्पसाठी 6 राज्याचे 155 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रति राज्य 10 विद्यार्थी व 1 संघ व्यवस्थापक अशी अकरा जणांची टीम होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व तेलंगणा या सहा राज्यांच्या जवळपास 21 युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी या शिबिरात समाविष्ट झाले होते. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाने केले. दहा विद्यार्थ्यांच्या या संघांमध्ये शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, देवचंद कॉलेज निपाणी व र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. टीमचे संघ व्यवस्थापक म्हणून माडखोलकर महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील यांची निवड केली होती. प्रा. पाटील यांनी महाराष्ट्राच्या संघाचे उत्तम नेतृत्व करून सहा राज्यांच्या संघांमध्ये महाराष्ट्राला दुसरा नंबर मिळवून दिला. 
टीमवर्क, श्रमदान, महाराष्ट्राची संस्कृती, कल्चरलच्या माध्यमातून सादरीकरण, योगा थीम, गीत गायन, नाटक, नेतृत्वकौशल्य, टाईम मॅनेजमेंट, प्रबोधन, प्रामाणिकता, प्रदूषण मुक्ती, महिला सबलीकरण कार्यक्रम, भोजनव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता दर्शन, वेशभूषा यासारख्या विविध कसोट्यावर संघाचे परीक्षण करण्यात आले. यामधूनच टीमची निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाने यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावत मानाची ट्रॉफी जिंकली. विद्यापीठाचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी संघ व्यवस्थापक व टीमचे अभिनंदन केले. दहा मुलांच्या या संघांमध्ये रभा माडखोलकर महाविद्यालयाचे सात विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने सर्व संघाचे अभिनंदन केले. संघाने उत्तम कामगिरी करत शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्राचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविला त्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment