![]() |
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर |
गोवा : माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री
मनोहर पर्रिकर यांचे आज निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने
भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना
व्यक्त होत आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात अफवा पसरत
होत्या. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद त्यांनी
भूषविले होते. २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून
निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची जबाबदारी सांभाळली होती. पंतप्रधानपदाचे
उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला
होता. त्यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी २०१४
ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले होते.
No comments:
Post a Comment