चंदगड / प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या चंदगड तालुका कार्यालयाचे नुकताच आजरा तालुका अध्यक्ष बयाजी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्ष चंदगड तालुक्यात गेली पाच, सहा महिन्यापासून कार्यरत आहे. तालुक्यात पक्षाची कार्यकरणी कार्यरत आहे. पक्षाच्या वतीने नुकताच चंदगड तालुका राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय नुकताच सुरुवात करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन आजरा तालुका अध्यक्ष बयाजी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. चंदगड तालुका अध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष चनाप्पा गावडे,सरचिटणीस विजय कांबळे, संपर्क प्रमुख प्रदिप गुरव, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष जुबेर शेरखान, कामगार आघाडी अध्यक्ष संतोष गावडे, दता सलामवाडकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment