तेऊरवाडी / प्रतिनिधी
जेथे प्रशासनाला ग्रामस्थांची साथ मिळते तेथे विकासाची गंगा वाहते याची प्रचिती तेऊरवाडी ता . चंदगड ग्रामस्थ घेत आहेत . गेल्या अनेक वर्षापासून पूर्णतः बंद पडलेला चक्री मार्ग ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने खुला केला . हा मार्ग खुला करताना या मार्गावरील अनेक बांधलेली घरे , गोबरगॅस पाडण्यात आले . गावच्या विकासासाठी ग्रामस्थानी मोठा त्याग करून रस्ता खुला करून दिला . याच रस्त्यावर गेल्या दोन दिवसापासून दगडांचा भराव टाकण्याचे काम चालू आहे . बघता बघता पंधरा ट्रॅक्टर व दोन जेसिबी यंत्राच्या सहयाने दोन किमी अंतराचा रस्ता तयार झाला . गाव करील ते राव काय करील याची प्रचिती पून्हा एकदा ग्रामस्थांनी दिली .याचबरोबर गावासाठी 51 लाखांची पाणीपूरवठा योजना मंजूर झाली आहे . तर जे आयसी कंपनिने गाव दत्तक घेऊन साठ लाखांचा निधी खर्च करणार आहे . एकंदरित शासनाच्या कोरडवाहू यादित असणाऱ्या तेऊरवाडीच्या विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नाची गरज आहे .
No comments:
Post a Comment