कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड ता. चंदगड येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ मंगळवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे . शिवाजी विद्यापीठ मार्फत या वर्षीपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वोदय शिक्षण संस्था अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए . एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात पदवी पात्र विद्यार्थी, पालक व उपस्थितांना शिवाजी विद्यापीठाचे संचालक प्रा डॉ जे एस बागी हे मार्गदर्शन करणार आहेत .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ विद्या परिषद सदस्य डॉ सतीश घाळी, वाणिज्य विभाग माजी विभागप्रमुख डॉ व्ही एस पाटील, हिंदी विभाग प्रमुख पी एस पाटील, संचालक प्रा पी सी पाटील हे सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत यावेळी कला, वाणिज्य व बीसीए विभागातील विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था सचिव एम व्ही पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment