- चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2019


चंदगड / प्रतिनिधी
कुमरी (ता. गडहिंग्लज) येथे आज 16 मार्च पासून अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे सारा कुमरी परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन गेला आहे. सप्ताह निमित्ताने भजन-कीर्तनाचे वातावरण निर्माण झाले. टाळ, मृदंगाच्या गजरात, भक्तीमय अभंग, गाण्याच्या आवाजामुळे घटप्रभा नदी काठचा अखंड परिसर भक्तांच्या भक्तीने ओसंडून गेला आहे. 16 मार्च ते 18 मार्च अखेर चालणाऱ्या या अखंड हरिणाम सप्ताहात ह.भ.प. महाराज बंडू रामा पाटील (कवळीकट्टी) यांचे प्रवचन दोन दिवस होणार आहे. तर तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये इतर धार्मिक विधी व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा कुमारी व परिसरातील  सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ व भक्त जणांनी केले आहे.

No comments:

Post a Comment