देवरवाडी येथील वैजनाथ मंदिराच्या सभामंडपास 5 लाखांचा निधी मंजूर - जि. प. सदस्या सुनिता रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2019

देवरवाडी येथील वैजनाथ मंदिराच्या सभामंडपास 5 लाखांचा निधी मंजूर - जि. प. सदस्या सुनिता रेडेकर

देवरवाडी (ता. चंदगड) येथे वैजनाथ मंदिराच्या आवारात सभामंडपाच्या बांधकामाचा शुभारंभ करताना जि. प. सदस्या सुनिता रेडेकर,  रेडेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर, वैजनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नारायण भोगन, सेक्रेटरी बसवराज पुजारी व इतर
चंदगड / प्रतिनिधी
देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ मंदिराच्या आवारात सभामंडप बांधण्यासाठी जि. प. सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांनी जिल्हा परिषदेच्या "क" वर्ग पर्यटन स्थळ विकास निधी मधुन 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या सभामंडपामुळे भाविकांची गैरसोय थांबणार आहे. या सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ जि. प. सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर, वैजनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नारायण भोगन, सेक्रेटरी बसवराज पुजारी, माजी सरपंच गोपाळ भोगन,बाळाराम करडे, पोलीस पाटील जयवंत कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष गणपत गुंडप, राजाराम जाधव, दौलत कांबळे, कल्लापा करडे, सचीन कवडेर, अमृत केसरकर, शंकर भोगन, विठ्ठल भोगन, अरुण कांबळे, मल्लापा केसरकर, युवराज जाधव, नागेश पाटील, रविंद्र यलवाडकर, चंदन म्याळदार, कल्लापा भोगन, संजय मरगाळे, शिवानंद पुजारी, तानाजी भोगन, वैभव केसरकर आदी उपस्थित होते. स्वागत व आभार बसवराज पुजारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment