सांबरे येथे उदया महाशिवरात्री उत्सव, विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2019

सांबरे येथे उदया महाशिवरात्री उत्सव, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांबरे येथील आकर्षक जागृत महादेव मंदिर
नेसरी / प्रतिनिधी
गडहिंग्लज उपविभागात सर्वात मोठा महाशिवरात्री उत्सव सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे सोमवार दि. 4 मार्च 2019 रोजी संपन्न होत आहे. जागृत शिवमंदिरात सकाळी पूजा व अभिषेक होणार आहे. दुपारी ओम मनः शिवाय जप, नामस्मरण, सायंकाळी गंगाजल आगमन, कलश मिरवणूक तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सांबरे ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई, बेळगाव, कोल्हापूर, पूणे, ठाणे, गोवा व सांबरे ग्रामस्थ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याची पूर्ण तयारी करण्यात आली असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संजय धनके व ग्रामस्थांनी केले आहे.


No comments:

Post a Comment