रोहित मोहिते आदर्श विद्यार्थी पुरस्कार तुडये, हाजगोळी, सुरूते येथील शाळेत प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2019

रोहित मोहिते आदर्श विद्यार्थी पुरस्कार तुडये, हाजगोळी, सुरूते येथील शाळेत प्रदान

तुडये (ता. चंदगड) येथील श्री रामलिंग हायस्कूलमध्ये आदर्श विद्यार्थ्यी पुरस्कार देताना रविंद्र मोहिते व शिक्षकवर्ग.
मजरे कारवे/ प्रतिनिधी
तुडये (ता. चंदगड) येथील दयानंद कृष्णाजी मोहिते आणि जोतिबा कृष्णाजी मोहिते या बंधूनी पुतण्या स्व. रोहित रवींद्र मोहिते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुडयेसह  परिसरातील हाजगोळी, सुरुते हायस्कूल मध्ये स्व. रोहित मोहिते आदर्श विध्यार्थी पुरस्कार जाहीर केले आहेत. आदर्श विद्यार्थी म्हणून हर्षल पुंडलिक मयेकर याचा गौरव पत्रकार रवींद्र मोहिते यांच्या हस्ते रोख रक्कम स्मुर्तीचिन्ह (चषक) देऊन करण्यात आला. तुडये येथील श्री. रामलिंग हायस्कूल मधील पुरस्कार वितरण सोहळा मुख्याध्यापक आय. के. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.  
यावेळी कमलेश जाधव व महादेव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 10 वी च्या विध्यार्थ्यांना या वेळी निरोप देण्यात आला.  विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात विविध विभागात शिक्षण घ्यावे. आई वडील आणि गुरु यांना विसरू नये असे मत कमलेश जाधव यांनी व्यक्त केले. स्व. रोहित मोहिते हा याच शाळेतील विद्यार्थी, बी. ई. चे शिक्षण झाले, मात्र त्याच्या अकाली जाण्याने एका हुशार विध्यार्थी हरपला आहे. त्याचा नावे आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्याची संकल्पना मोहिते परिवाराने उल्लेखनिय अशी केली आहे असे मत प्राध्यापक. ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी आय. के. स्वामी. एन.एम. पाचवडेकर,  जी. बी. बुवा. यांची भाषणे झाली. एम. एल. बोकडे, व्ही. एल. कांबळे, व्ही. एल. सुतार व  शिक्षक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment