![]() |
कानडी (ता. चंदगड) येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेली मोटरसायकल. |
चंदगड / प्रतिनिधी
कानडी (ता. चंदगड) येथे अचानकपणे गोठ्यासह घराला लागलेल्या लक्ष्मण सदाशिव देसाई यांचे अंदाजे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये गाय, म्हैस, कुत्रे वासरु, मोटरसायकल यासह अन्य संसारपयोगी वस्तु जळून खाक झाले. आज दुपारी बाराच्या दरम्यान वाजता हि घटना घडली. आगीचे नेमके कारण कळालेले नाही.
कानडी येथे रहात असलेल्या लक्ष्मण देसाई यांच्या घराच्या बाजुलाच गोठा आहे. आज दुपारी गोठ्याला अचानकपणे आग लागली. दुपारच्या वेळी भर उन्हात आग लागल्यामुळे गोठ्यामध्ये असलेली कडबाकुटी मशीन, पीव्हीसी, मोटरसायकल, शेतात पिकविलेले दोन क्विंटल आले व संसारोपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले. आगीमध्ये एक वासरु, कुत्रे, म्हैस हि तीन जनावारे जळून जागीच खाक झाली. तर एक गाय व म्हैस भाजून गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण कडाक्याच्या उन्ह्यामुळे आगीने संपुर्ण गोठा जाळून खाक केला. या आगीमध्ये देसाई कुटुंबियांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. गावकामगार तलाठी श्री. कांबळे व पोलिस पाटील यांनी पंचनामा केला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामा करुन तुटपुंजी मदत देण्याएवजी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment