भाजपच्या वतीने मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते. |
भाजपा विजय संकल्प अभियानाच्या निमित्ताने भाजपा-चंदगड यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करून रॅलीला सुरवात झाली. हलकर्णी येथे महाराष्ट्र राज्य कार्यकर्णी सदस्य गोपाळ पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. हलकर्णी फाटा येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून "हर हर मोदी, घर घर मोदी, मोदींचा विजय असो" अशा घोषणा देत रॅलीला सुरवात झाली. भाजपा विजय संकल्प अभियानानिमित्ताने भारतीय जनता पार्टी शाखा चंदगड यांच्या नेतृत्वाखाली हलकर्णी, कार्वे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कोवाड, माणगाव, तांबुळवाडी, नागणवाडी, चंदगड या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपाप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. चंदगड दुपारी चार वाजता रॅलीची सांगता झाली.
No comments:
Post a Comment